---Advertisement---

आसामचे माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई यांचे निधन

On: November 23, 2020 7:04 PM
Follow Us:
---Advertisement---

गुवाहटी: आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचं आज(२३ नोव्हेंबर) सायंकाळी निधन झाले आहे. ते ८६ वर्षांचे होते. राज्याचे आरोग्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी याबाबत माहिती दिली आहे.

कोरोनामुक्त झाल्यानंतर तरुण गोगोई यांची प्रकृती पुन्हा बिघडली होती. त्यानंतर गोगोई यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, तरुण गोगोई यांची प्रकृती शनिवारी अचानक बिघडली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना GMCH रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गोगोई यांची प्रकृती सुधारण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र डॉक्टरांना यश आले नाही.

तरुण गोगोई यांनी आसाममध्ये सलग तीन टर्म मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व केले होते. काँग्रेसमध्ये त्यांनी केंद्र आणि राज्य पातळीवर महत्वाच्या पदांवर काम केले होते.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!