---Advertisement---

काँग्रेसचा आधारस्तंभ हरपला, राहुल गांधींची ट्विटरवरुन पटेल यांना श्रद्धांजली

On: November 25, 2020 11:04 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे विश्वासू राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे निधन झालं. अहमद पटेल यांच्या निधनाचं वृत्त कळताच काँग्रेसवर शोककळा पसरली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.  राहुल गांधी यांनी पक्षाचा एक स्तंभ हरपला, अशी भावना व्यक्त करत पटेल यांना  ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली आहे.

राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “हा एक दु: खद दिवस आहे. अहमद पटेल हे काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ होते. पक्षाच्या सर्वात कठीण काळात ते पक्षासोबत उभे होते, त्यांनी काँग्रेस पक्षातच अखेरचा श्वास घेतला. आम्हाला त्यांची खूप आठवण येईल. फैजल, मुमताज आणि पटेल कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत”.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!