---Advertisement---

कौटुंबिक निवृत्तीवेतन योजनेच्या नियमात शिथिलता

Follow Us:
---Advertisement---

 

दिल्ली,दि.२७ : देशातील घटस्फोटित महिलांना कौटुंबिक निवृत्ती वेतन मिळण्यासाठीचे नियम शिथिल करण्यात आल्याची माहिती केंद्रीय सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली आहे.

मुलीच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झालेली नसली तरी संबंधित घटस्फोट याचिका तिच्या पालक कर्मचाऱ्यांच्या किंवा निवृत्तीवेतनधारकांच्या हयातीत दाखल केलेली असल्यास कौटुंबिक निवृत्तीवेतन घेण्यास ती पात्र असेल,असेही ते म्हणाले.किंवा निवृत्तीवेतन धारकांच्या मृत्यूनंतर दिव्यांग मुलाला किंवा भावंडाना देखील अपंगत्वाचा दाखला सादर केला तर निवृत्ती वेतन मिळू शकते, असे ते म्हणाले. दिव्यांग निवृत्तीवेतन धारकांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांच्या मदतीसाठी दिल्या जाणाऱ्या भत्त्यात साडेचार हजार रुपयांवरून सहा हजार सातशे रुपये वाढ करण्यात आल्याचे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!