---Advertisement---

गुन्हेगारांसोबत अनिल देशमुखांचा फोटो व्हायरल; गृहमंत्री म्हणाले….

On: February 2, 2021 12:27 PM
Follow Us:
---Advertisement---

औरंगाबाद : औरंगाबाद दौऱ्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख असताना त्यांच्याभोवती गुन्हेगारांना गराडा असल्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गृहमंत्र्याच्या शेजारी या फोटोमध्ये उभ्या असलेल्या या तिघांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. या फोटोमध्ये सराईत गुन्हेगार उपस्थित असल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे. यावर अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

अनिल देशमुख म्हणाले कि, मी औरंगाबादला दौऱ्यावर गेलो होतो. दौऱ्यावर गेल्यानंतर हजारो लोक भेटण्यासाठी येत असतात, निवेदन देत असतात. अशावेळी कोणती व्यक्ती, त्याचा काय व्यवसाय याची माहिती नसते. त्यामुळे हा प्रकार घडला. पण यापुढे अवश्य काळजी घेण्यात येईल, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, औरंगाबाद शहरात एका कार्यक्रमात अनिल देशमुख यांच्यासोबत तिघांनी काढला होता. या फोटोत गृहमंत्र्यांशेजारी उभ्या असलेल्या तिघांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. यातील कलीम कुरेशी याची गुटखा किंग म्हणून ओळख आहे. पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी मध्यंतरी ड्रग्स प्रकरणी एक गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. सय्यद मतीन याच्यावर बलात्कारासह अन्य गुन्हे दाखल आहे. तसेच तडीपारीची कारवाई देखील प्रस्तावित आहे. तर जफर बिल्डर याच्यावर ५०० ट्रक चोरून सुटे भाग करून विकणाऱ्या टोळीतला हा गुन्हेगार आहे

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!