---Advertisement---

जय हिंदने शेतकऱ्यांचा विश्वास कमावला ; माने-देशमुख

On: November 26, 2020 10:58 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट  : देशाच्या आर्थिक जडणघडणीसाठी शेतकऱ्यांची भूमिका निर्णायक असते.शेतकऱ्यांच्या नशिबी नेहमीच चढ उतार ठरलेले असतात.मात्र शेतकरी सर्व संकटातुन वावरत शाश्वत शेतीसाठी अहोरात्र परिश्रम घेतात.ही बाब लक्षात घेऊन जयहिंद परिवाराच्या माध्यमातुन शेतकऱ्यांच्या विश्वासाप्रती झटणार असल्याचे चेअरमन गणेश माने देशमुख यांनी सांगितले.

आचेगांव (ता.दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगर्सच्या साखर पोत्यांचे पुजन चेअरमन माने देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मार्गदर्शक बब्रुवान माने देशमुख,व्हाईस चेअरमन विक्रमसिंह पाटील,कार्यकारी संचालक मोहन पिसे,शेतकी अधिकारी राजेंद्र जेऊरे,विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना माने देशमुख म्हणाले की, जयहिंद परिवाराने नेहमीच शेतकरी व सामाजिक हित जोपासले आहे. दुष्काळनिवारणासाठी जलसंधारणाची कामे,पाणीपुरवठा,गणेशोत्सव व नवरात्रीच्या माध्यमातुन समाजातील सर्व घटकांसोबत विविध उपक्रम, जयहिंद आपल्या दारी या उपक्रमांतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर जात बिल अदा केले आहेत.याचेच फलित म्हणून यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जयहिंदला मोठ्या प्रमाणावर ऊस पुरवठा केला आहे.

हार्वेस्टरमुळे शेतकऱ्यांची सोय

शेतकऱ्यांनी अनेक वर्षांपासून जयहिंद परिवारावर मोठा विश्वास टाकला आहे.यावर्षी ऊसाचे वाढते क्षेत्र लक्षात घेऊन १८  हार्वेस्टर मशिन खरेदी केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक व वेळेची बचत होणार आहे.अक्कलकोट व दक्षिणमधील अनेक गावांतील शेतकरी या यंत्रणेमुळे सुखावला आहे.

 -बब्रुवान माने देशमुख (मार्गदर्शक,जयहिंद शुगर्स)

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!