ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात लस रवाना

पुणे । देशभर चर्चेचा विषय ठरलेली कोरोना साथरोगावरील कोव्हिशील्ड लस आज पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून वितरणासाठी रवाना झाली. तीन कंटनेरमधून ही लस विमानतळावर पाठवण्यात आली.

एअरपोर्टहून वॅक्सिनचे डोस देशभरात पाठवण्यात येणार आहेत. देशात 16 जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लसीच्या पहिल्या बॅचचे ट्रक रवाना झाले आहेत. पोलिसांनी सीरम इन्स्टिट्यूटपासून या वाहनाला एअरपोर्टपर्यंत सुरक्षा पुरवली. त्याआधी पोलिसांकडून लस घेऊन जाणाऱ्या या गाडीची पुजाही करण्यात आली.

ही लस पुणे एअरपोर्टवरुन कार्गो विमानांद्वारे देशभरात पाठवली जाणार आहे. आज अशाप्रकारची आणखी तीन वाहनं लसीचे डोस घेऊन पुणे एअरपोर्टला रवाना होणार आहेत. काल केंद्र सरकारने कोविशील्ड लसीचे एक कोटी दहा लाख डोस पुरवण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटला ऑर्डर दिल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटकडून आजपासून ही लस पाठवणं सुरु करण्यात आलं आहे.

पुण्यातून कोव्हिशिल्ड लस देशातील १३ शहरांत पाठवण्यात येणार आहे. त्यात औरंगाबाद, अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, कोलकाता, कर्नाल, विजयवाडा, हैदराबाद, लखनऊ, चंदीगड, भुवनेश्वर, गुवाहाटी या शहरांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!