---Advertisement---

यंदाची कार्तिकी एकादशीला वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश बंद

On: November 20, 2020 7:43 PM
Follow Us:
---Advertisement---

पंढरपूर : देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिल्लीत दुसरी लाट धडकल्यानं दिल्लीतील स्थिती दिवसेंदिवस अधिकच नाजूक होत चालली. महाराष्ट्रात नियंत्रणात आलेल्या कोरोनाचा उद्रेक पुन्हा होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून राज्य शासनाने विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पंढरपूरकडे दिंड्या पाठवू नका, असे आदेश दिले आहेत. यंदाची कार्तिकी एकादशी 26 नोव्हेंबरला आहे, मात्र, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कार्तिकी एकादशीला वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे.  कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूर आणि परिसरातील 8 ते 10 गावांमध्ये संचारबंदी लावण्यात येणार आहे.

या वारीसाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यातून शेकडोंच्या संख्येने दिंड्या आणि पालख्या पंढरीत होत असतात. या सर्व सोहळ्यांना राज्य शासनाने घातली बंदी, आषाढी यात्रेनंतर कार्तिक वारी ही निर्बंधातच होणार आहे. साधारण पाच ते सात लाख वारकरी भाविक या वारीला हजेरी लावतात. एवढ्या मोठ्या संख्येने भाविक एकत्रित जमले तर कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावू शकतो आणि वारीला येणाऱ्या भाविकांच्या जीविताला धोका पोहोचू शकतो. ही शक्यता गृहीत धरुन राज्य शासनाने कार्तिकीला येणाऱ्या दिंड्या आणि पालख्यांना बंदी घातली आहे.

दरम्यान, चार महिन्यांपूर्वी झालेल्या आषाढीवारीला असे नियम लावण्यात आले होते आणि वारी प्रातिनिधिक स्वरुपात साजरी करण्यात आली होती. यावेळी कार्तिकी वारी देखील प्रातिनिधिक स्वरुपात साजरी करण्याच्या हालचाली वारकरी संप्रदायात सुरु आहे. तर दुसरीकडे कार्तिकी यात्रेसाठी पंढपुरात २२ नोव्हेंबर रात्री १२ पासून २६ नोव्हेंबरपर्यंत एसटी बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे. तर २५ नोव्हेंबर रात्री १२ पासून २६ नोव्हेंबर रात्री १२ पर्यंत शहर व परिसरातील ५ किलोमीटर अंतरापर्यंत संचारबंदी लावण्यात आली आहे. मात्र वारकरी या निर्णयाला कसे स्वीकारतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!