---Advertisement---

रशियाने ‘स्पुटनिक व्ही’ लशीची केली किंमत जाहीर, ‘एवढी’ असेल किंमत

On: November 24, 2020 7:38 PM
Follow Us:
---Advertisement---

मॉस्को: जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लस शोधण्यासाठी संशोधक दिवसरात्र मेहनत घेत आहेत. काही लशींची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहेत. या चाचणीतील प्राथमिक निष्कर्ष सकारात्मक आले आहेत. या लशींची किंमत किती असेल यावरही चर्चा सुरू असताना रशियाने आपल्या ‘स्पुटनिक व्ही’ या  लशीची किंमत जाहीर केली आहे.

रशियाने पहिल्यांदाच करोनाला अटकाव करणारी लस म्हणून स्पुटनिकला मान्यता दिली होती.  ही लस रशियात नागरिकांसाठी मोफत उपलब्ध असणार आहे. तर, इतर देशांमध्ये या लशीचा एक डोस १० डॉलरपेक्षाही (७४० रुपये) कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे.

मॉडर्ना आणि फायजर यांच्या लशीपेक्षा ‘स्पुटनिक व्ही’ची किंमत कमी असणार असल्याचे याआधीच रशियाकडून स्पष्ट करण्यात आले होते. फायजरची किंमत ही प्रति डोस १९.५० डॉलर (१४४६.१७ रुपये) आणि मॉडर्नाची किंमत २५ ते ३७ डॉलर (१८५४ ते २७४४ रुपये) इतकी असणार आहे. त्यामुळे प्रति व्यक्ती ३९ डॉलर आणि ५० ते ७४ डॉलर इतकी लशीची किंमत असणार आहे. फायजर, मॉडर्ना आणि स्पुटनिक व्ही या लशींच्या दोन डोसची आवश्यकता असणार आहे.

फायजरने आपल्या लशीच्या अंतिम टप्प्यातील चाचणीचे प्राथमिक निष्कर्ष जाहीर केल्यानंतर दोन दिवसानंतर रशियाने आपली लस ९२ टक्के प्रभावी असल्याची माहिती दिली. भारतातही रशियन लशीची मानवी चाचणी सुरू होणार आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीच्यावतीने ही चाचणी होणार आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी ११ ऑगस्ट रोजी या लशीला मंजुरी दिली असल्याची घोषणा केली होती. या लशीला मॉस्कोच्या गामलेया रिसर्च इन्स्टिट्यूटने संरक्षण मंत्रालयासोबत विकसित केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!