---Advertisement---

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भगीरथ भालके बिनविरोध

On: December 21, 2020 1:47 PM
Follow Us:
---Advertisement---

पंढरपूर : पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या सुपुत्राची वर्णी लागली आहे. भगीरथ भालके यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली.

 

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. सुरुवातीपासूनच भगीरथ भालके यांनीच चेअरमन व्हावे, अशी शेतकरी सभासदांचे मत होते. कारखान्याचे संस्थापक दिवंगत औदुंबर आण्णा पाटील यांचे नातू युवराज पाटील चेअरमन पदासाठी इच्छुक होते.

मात्र, विठ्ठल परिवारातील नेते असणारे कल्याणराव काळे, युवराज पाटील व तसेच अन्य नेत्यांनी संचालक मंडळाशी चर्चा केली. यातून अध्यक्षपदासाठी भगीरथ भालके यांचे नाव पुढे आले. आणि त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!