सोलापूर दि.२८ : ड्रॉप रोबॉल असोसिएशन ऑफ सोलापूर यांच्यावतीने बाराव्या वर्धापन दिनानिमित्त शहर-जिल्ह्यातील राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय २८ खेळाडूंसह मार्गदर्शक व पंचांचा ट्रॉफी देवून सन्मान करण्यात आले.
निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विजयकुमार हुल्ले होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष दशरथ गुरव ,ड्रॉप रोबॉलचे राज्य उपाध्यक्ष विठ्ठल कुंभार , ड्रॉपरोबॉल जिल्हा अध्यक्ष प्रकाश कोरे, सुहास छंचुरे, अजित पाटील, श्रीशैल व्हनमाने ,प्रसन्न काटकर आदी उपस्थित होते. यावेळी विठ्ठल कुंभार म्हणाले, खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी खेळाडूंसह मार्गदर्शक शिक्षक व पंचांचा गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहर -जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी ड्रॉप रोबॉलचा खेळ वाढवण्यासाठी शाळेतील खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन ते केले .यावेळी जिल्हा अध्यक्ष दशरथ गुरव म्हणाले ,ड्रॉप रोबॉल असोसिएशनचा उपक्रम स्तुत्य असून पालकांनी व मुख्याध्यापकांनी खेळाडूंचे कौतुक करावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वाराध्य मठपती यांनी केले तर अशोक पाटील यांनी आभार मानले.
फोटोओळ-ड्रॉप रोबॉल असोसिएशनतर्फे आयोजित खेळाडूंच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी विजयकुमार हुल्ले, दशरथ गुरव ,विठ्ठल कुंभार, प्रकाश कोरे, सुहास छंचुरे, अजित पाटील, श्रीशैल व्हनमाने , प्रसन्न काटकर