अक्कलकोट, दि.२९ : सोलापूरात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अन्य काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या सोलापूर जिल्हा परिषदसमोरील काँग्रेस भवनासमोरील पोष्टरवर शाईफेक केल्याप्रकरणी अक्कलकोट शहर व तालुका काँग्रेसतर्फे जाहीर निषेध करण्यात आला.
यात दगडफेक व शाईफेक केलेल्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. शनिवारी, काही अज्ञात समाजकंटकांनी हे कृत्य केले आहे.
अशा गुन्हेगारांचा त्वरीत शोध घेऊन कठोर कारवाई करावे, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष अश्पाक बळोरगी यांच्या नेतृत्वाखाली दुधनी बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, सभापती आनंद सोनकांबळे यांच्या उपस्थितीत नायब तहसीलदार मिलींद कांबळे यांना निवेदन देऊन करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, विलास गव्हाणे, नगरसेवक सद्दाम शेरीकर, विकास मोरे,चंदन अडवितोटे, अक्कलकोट युवक काँग्रेस अध्यक्ष बाबासाहेब पाटील, शहर अध्यक्ष मुबारक कोरबु, सुनिल खवळे, शशिकांत भकरे, युवा नेते धर्मराज गुंजले, प्रविण शटगार, फारूख बबची, सुनिल ईसापुरे, महादेव चुंगी, हमिद गिलकी, गणेश अलोळी, राहुल भकरे, सिद्धाराम बिराजदार, सिद्धू म्हेत्रे, गुरू म्हेत्रे, सरफराज शेख, राजु पाटोळे, पंडीत पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.