---Advertisement---

जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

Follow Us:
---Advertisement---

 

जम्मू- काश्मीर : जम्मू- काश्मीरमध्ये कुलगाम आणि पुलवामा येथे तीन वेग-वेगळ्या ठिकाणी पार पडलेल्या चकमकीत भारतीय जवानांनी 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. बुधवार आणि गुरुवारी मध्यरात्री रात्री पुलवामाच्या पुचल भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत लष्कर-ए-तोयबा (एलईटी) चे दोन दहशतवादी ठार झाले आहेत. त्याचवेळी पुलवामामध्येच झालेल्या आणखी एका चकमकीत आणखी दोन दहशतवादी ठार झाले आहेत. त्यामुळे सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे.

सुरक्षा जवानांना कुलगाम जिल्ह्यातील झोदार परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर जवानांनी परिसर सील करत सर्च ऑपरेशन सुरू केला.

सर्च ऑपरेशन सुरू असताना दहशतवाद्यांनी सुरक्षित जवानांवर गोळीबार सुरु केला आणि चकमकी ला सुरुवात झाली चकमकीत लष्कर-ए-तय्यबा चे दोन दहशतवादी ठार झाले आहेत. तर दुसरीकडे पुलवामा येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी आणि हंदवारा येथे एक दहशतवाद्याला ठार करण्यात आला आहे. आतापर्यंत 24 तासात एकूण पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीर पोलीस आयजीपी विजयकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार या चकमकीत हिजबूलचा टॉप दहशतवादी मेहराजुदिन उर्फ उबाईद हंडवारामध्ये मारला गेला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!