---Advertisement---

गोगांव येथील बेघर वस्ती मधील नवीन डीपीचे उद्घाटन

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.१ : गोगांव (ता. अक्कलकोट) येथे बेघर वस्ती येथे नवीन डीपी बसवल्याने नागरिकांचा विजेचा प्रश्न मिटला आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. एकच डीपी वर संपूर्ण गावचे विद्युत कनेक्शन असल्याने गावात अनेक समस्याला तोड द्यावे लागत होते व घरातील विद्युत दिवा व फॅन टीव्ही आदी लोड घेत नव्हते त्यावेळी ग्राहकांना अनेक अडचणींनाना तोड द्यावे लागत होते या समस्यांचे मार्ग काढण्यासाठी सरपंच संघटना तालुकाध्यक्ष प्रदीप जगताप यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे पाठपुरावा करून डी पी डी सी मधून काम मंजूर करून घेण्यात आले होते.

सदर काम वेळेत पूर्ण करण्यासाठी सरपंच वनिता सुरवसे ,उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांनी पाठपुरावा करून कामपूर्ण करून घेऊन आज गावकऱ्यांच्या उपस्थितीत व सरपंच संघटना तालुकाध्यक्ष प्रदीप जगताप, उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

हर्षवर्धन पाटील सहायक अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली बसय्या स्वामी ,राम मोरे, सचिन ठोबरे यांनी सदर काम वेळेत केल्यामुळे गावकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी कलप्पा वाडे, श्रीशैल पाटील, बाळप्पा जावळे,परमेश्वर बिराजदार, शरणप्पा कलशेट्टी,नबीलाल नदाफ, राम जमादार, लक्ष्मण गायकवाड, सुरेश सोनकांबळे, बसप्पा आलूरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!