---Advertisement---

अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी 14 कोटीच्या आराखड्यास मान्यता मिळाल्याने कुलगुरु डॉ. फडणवीस यांच्याकडून आनंद

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ परिसरात अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक तसेच टॉवरच्या बांधकामासाठी हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागणी अर्थसंकल्पात 14 कोटी 24 लाख 92 हजाराच्या आराखड्यास मान्यता मिळाल्याने कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे.सन 2021-22 या चालू आर्थिक वर्षात स्मारकाच्या कामकाजासाठी 1 कोटी 73 लाख 91 हजाराची तरतूद करण्यात आलेली आहे. या निधीसाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. राज्य शासनाकडून निधीची तरतूद करण्यात आल्याने कुलगुरू डॉ फडणवीस यांनी आनंद व्यक्त करीत विद्यापीठासाठी ही भूषणावह बाब असल्याचे म्हंटले आहे. निधीची तरतूद झाल्याने स्मारकाचे काम वेगाने सुरु होईल असेही त्यांनी म्हंटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!