मुंबई : भाजप आमदार नितेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुद्दाम अडकविण्यासाठी आणि जिल्हा बँक राणे यांच्या हातात जाईल म्हणून हा दबाव आणला जाईल या भीतीने पोलिसांचा वापर करून त्यांना अडकविले जात आहे, असे आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे.
विधानभवनच्या पायर्यांवर जो प्रकार झाला तो निंदनीय आहे. काही दिवसांपूर्वी घटना घडली त्या घटनेला हाताशी धरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस पाठविण्यात आले. पोलिसांनी कारवाई करताना नारायण राणे हे एक कॅबिनेट मंत्री आहेत याची भान ठेवावे असेही प्रवीण दरेकर म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारकडून नियोजनबद्धरित्या नारायण राणे यांना अडकविण्याचा कार्यक्रम सुरू आहे. यासाठी पोलिसांवर दबाव आणला जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यात होते तेव्हाच नितेश राणे यांना अटक करायची असं ठरलं असाव असेही दरेकर म्हणाले.