---Advertisement---

उच्चशिक्षणासाठी ऐश्वर्या सिद्धार्थ गायकवाड ३१ डिसेंबरला अमेरिकेला रवाना

Follow Us:
---Advertisement---

 

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट,दि.२९ : लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थीनी कु. ऐश्वर्या सिद्धार्थ गायकवाड ही अमेरिकेतील ईस्टर्न विद्यापीठ बोस्टन येथे एमएस बॉयो टेक्नॉलॉजी या शाखेत उच्च शिक्षणासाठी व मॉलीक्यूलर बॉयोटेक्नॉलॉजी या विषयांअंतर्गत विविध शिक्षणासाठी ३१ डिसेंबरला अमेरिका दौऱ्यावर जात आहे.तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.माजी उपसभापती सिद्धार्थ गायकवाड व विद्यमान पंचायत समिती सदस्य सुनंदा गायकवाड यांची त्या कन्या आहेत.यशाबद्दल माजी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी म्हेत्रे, आमदार सुभाष देशमुख, सभापती आनंदराव सोनकांबळे, उपसभापती प्रकाश हिप्परगी,माजी सभापती सुरेखा काटगांव, प्राचार्य अमोल शिंदे, सर्व पंचायत समितीचे सदस्य यांनी तिचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.यानिमित्त तिचा सत्कार करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!