ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर येथे होणारी जाहीर सभा रद्द, पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीची केंद्रीय गृहविभागाने घेतली गंभीर दखल

पंजाब : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर इथे होणारी जाहीर सभारद्द करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी स्टेजवरून घोषणा करत पंतप्रधान मोदी हे सभेला येणार नसल्याचे जाहीर केले. आजतक या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांचा ताफा १५ ते २० मिनिटं एकाच जागी उभा होता.

पंतप्रधान ज्यामा र्गाने जात होते, त्या मार्गावर आंदोलन करण्यात आलं होतं आणि आंदोलना मुळेच पंतप्रधानांचा ताफा अडला होता. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ही एक मोठी चूक मानली जात असून, या चुकीमुळेच पंतप्रधानांची सभा रद्द करावी लागली अशी चर्चा आहे.

केंद्रीय गृहविभागाने पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील या त्रुटीची गंभीर दखल घेतली आहे. ही त्रुटी कशी राहिली याबाबतचं उत्तर गृहविभागाने पंजाब सरकारकडे मागितलं आहे. या चुकीसाठी जबाबदार कोण होतं, ते देखील निश्चित करण्याचे आदेश गृहविभागाने दिले आहेत. पंजाब सरकारने रस्त्यावरून पंतप्रधानांच्या होणाऱ्या प्रवासासाठी आकस्मिक परिस्थिती लक्षात घेता अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था पुरवणं गरजेचं होतं, मात्र ही सुरक्षा पुरवली गेली नव्हती. ही पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील सगळ्यात मोठी त्रुटी होती अस केंद्रीय गृहविभागाने म्हटलं आहे. या त्रुटी मुळेच पंतप्रधानांना पुन्हा बठिंडा विमानतळावर नेण्यात आल्याचंही गृहविभागाने म्हटलं आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आरोप केला आहे की, या सगळ्याला पंजाबमधील सत्ताधारी काँग्रेस पक्ष जबाबदा र आहे. पोलिसांनी या सभेसाठी येणाऱ्या लोकांना आणि बसेसना अडवून ठेवलं होतं. असा नड्डा यांनी आरोप केला आहे. ही परिस्थिती निवळावी यासाठी तिथले मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांनी काहीही प्रयत्न केले नाहीत, ते फोनवरही आले नाहीत असा ही आरोप नड्डा यां नी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!