सोलापूर, दि.११ : महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी आज सकाळी मुंबई ज्येष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार यांची भेट घेतली.
गेले काही दिवस आनंद चंदनशिवे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. परंतु मध्यंतरीच्या काळात त्यांच्या प्रवेशाबाबत उलट-सुलट चर्चा होत्या. मात्र आजच्या भेटीने चंदनशिवे नगरसेवक पुजारी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश नक्की मानला जात आहे. येत्या 14 जानेवारीस चंदनशिवे पुन्हा एकदा शरद पवारांना भेटणार आहेत.






