---Advertisement---

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त दुधनी येथे डीपीएल क्रिकेट स्पर्धेचे उद्घघाटन

Follow Us:
---Advertisement---

 

 

दुधनी दि. ७ : संपुर्ण जगाला भुरळ पाडलेल्या आयपीएलच्या धर्तीवर दुधनी येथे ‘डीपीएल’ दुधनी प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. अक्क्लकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या ४०व्या वाढदिवसानिमित्त या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

कर्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अक्कलकोट्चे नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी हे होते. यावेळी दुधनीचे नगराध्यक्ष भिमाशंकर इंगळे, नगरसेवक महेश पाटील, अतुल मेळकुंदे बाबा टक्कळकी आणि इतर मान्यवर उपस्थीत होते. प्रारंभी कार्यक्रमाच्या सुरुवातीला बॉल, स्टंप आणि बॅट्चे पुजन अक्क्लकोट नगरपालीकेचे नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांचे सत्कार दुधनी शहर भाजपचे अध्यक्ष सातलिंगप्पा परमशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत सोळा संघानी सहभाग घेतला असुन विजेत्या संघासह उत्कृष्ट कामगिरी करणार्या खेळांडुसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. आहेत.यावेळी बसवराज हौदे, हणमंत कलशेट्टी, अर्जुन पुजारी, बसवराज गुरुभेट्टी, शिवकुमार हौदे, गुंडुराज राठोड, कपिल जन्ना, माळु पुजारी, अजहर डिग्गी, महेश राठोड यांच्यासह अनेकनगरिक उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!