---Advertisement---

जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर, दि.26 : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते ठीक सकाळी 8:15 वाजता ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, सहायक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे, अरुणा गायकवाड, हेमंत निकम, सुमित शिंदे, खनी कर्म अधिकारी दिव्या वर्मा, तहसीलदार अंजली मरोड, तहसीलदार दत्तात्रय मोहोळे यांच्यासह महसूल विभागाचे अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकारी शंभरकर व इतर सर्व उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेचे वाचन केले.

  • अपर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीत ध्वजारोहण

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रशासकीय इमारतीत अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्या हस्ते ठीक सकाळी 7:45 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रशासकीय इमारतीतील विविध विभागाचे विभाग प्रमुख व अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!