ध्यास विश्वसार्ह बातमीचा

फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी राजीव माने तर उपाध्यक्षपदी प्रल्हाद जाधव

अक्कलकोट, दि.१३ : अक्कलकोट येथील श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी माजी आमदार बाबूराव माने यांचे पुत्र राजीव माने यांची तर उपाध्यक्षपदी प्रल्हाद जाधव
यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत कै.सर्जेराव जाधव फत्तेसिंह शिक्षण संस्था विकास पॅनलने सात पैकी सात जागा जिंकून वर्चस्व प्रस्थापित केले होते.या पार्श्वभूमीवर अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक आज बोलवण्यात आली होती.त्यावेळी या निवडी पार पडल्या.नियोजित अध्यक्षपदाचे नाव फुटाणे यांनी जाहीर केले तर उपाध्यक्षपदाचे नाव अध्यक्ष माने यांनी जाहीर केले.याला सर्व संचालकांनी अनुमोदन दिले.यावेळी सर्जेराव जाधव
चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शरद फुटाणे,माजी अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर,जेष्ठ नेते सुरेशचंद्र सूर्यवंशी,स्वामीराव पाटील,डॉ.मनोहर मोरे,शिवाजीराव पाटील यांच्यासह नूतन संचालक बाळासाहेब मोरे,संतोष जाधव (फुटाणे), तानाजी चव्हाण,सुधाकर गोंडाळ,अमर शिंदे हे उपस्थित होते.यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष माने म्हणाले, कै.आमदार बी.टी माने, स्व.सर्जेराव जाधव,कै.उध्दवराव जंगाले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा विस्तार झाला आहे.
या संस्थेची स्थापना १९२७ साली झाली असून ही संस्था तालुक्यात सर्वात जुनी आणि मोठी आहे.संस्थेचा कारभार पारदर्शक व्हावा त्याच बरोबर सर्वांना विश्वासात घेऊन करावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहे.संस्थेचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावू.संस्थेला गतवैभव प्राप्त करून देऊ,असे अभिवचन त्यांनी दिले.

सभासदांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र राहून घेऊन संस्थेचा कारभार गतिमान करू आणि टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही,अशी ग्वाही उपाध्यक्ष जाधव यांनी दिली. संस्थेच्या प्रगतीसाठी निवडून आलेल्या सात संचालकांनी स्वतः अध्यक्ष समजूनच काम करावे आणि संस्थेची प्रगती साधावी असे आवाहन माजी अध्यक्ष शरद फुटाणे यांनी केले.नूतन संचालक मोरे यांनी संस्थेचा कारभार ही सत्ता न समजता सेवेची संधी म्हणून करू,असे सांगितले.यावेळी सुरेशचंद्र सूर्यवंशी,सुरेश फडतरे,मोहन चव्हाण,भीमराव साठे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास शंकरराव पवार,अमर पाटील,सूर्याजी पाटील,राजू नवले, सोपानराव गोंडाळ, विलास हांडे, आनंदराव माने,नंदू चव्हाण, लक्ष्मण पाटील,अरविंद कोकाटे,
प्रकाश पडवळकर , प्रवीण घाडगे,रवी कदम,विकास सुरवसे आदींची उपस्थिती होती.निवडीनंतर सर्जेराव जाधव सभागृहात सर्वांनी नूतन संचालक ,अध्यक्ष,उपाध्यक्ष
यांचा संस्थेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी यांच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना मावळते अध्यक्ष निंबाळकर यांनी संस्थेला पुढील काळात देखील जी मदत लागेल ती करण्यासाठी आपण सहकार्य करू,अशी ग्वाही दिली.यावेळी सर्व संस्थांमध्ये शिक्षक बांधव,मराठा समाजातील प्रतिष्ठित मान्यवर,नागरिक
मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

संस्थेच्या हितासाठी
५१ हजाराची देणगी

संस्थेच्या इतिहासात प्रथमच अध्यक्ष निवड झाल्यानंतर माजी आमदार बाबुराव माने यांचे पुत्र राजीव माने यांनी संस्थेसाठी ५१ हजाराची देणगी दिली तर उपाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी एकवीस हजार रुपयांची देणगी दिली.त्याचे संचालक मंडळाने स्वागत केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!