औरंगाबाद ,दि.१ : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणावरून मोठे वाद विवाद सुरू आहेत.
या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील भोंग्याचा विषयावरून आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना चांगलेच टार्गेट केले आहे.औरंगाबादच्या सभेत त्यांनी पुन्हा एकदा सरकारला ४ मेचा अल्टिमेटम दिलेला आहे.४ तारखेपर्यंत भोंगे उतरावा, अन्यथा मशिदीसमोर हनुमान चालीसा लावला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
राज ठाकरे यांच्या भाषणातील
काही ठळक मुद्दे.
# शरद पवार यांच्यावर जोरदार टीका
शरद पवार यांच्यामुळे महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण वाढल गेलं.
शरद पवारांनी जेम्स लेन वरून बाबासाहेब पुरंदरे यांना त्रास दिला.
शरद पवार नास्तिक असलेली कबुली त्यांच्या कन्यने दिली.
शरद पवारांना हिंदुधर्माची एलर्जी.
शरद पवार यांनी शिवाजी महाराजांचे नाव आता घ्यायला सुरुवात केली.
शरद पवार शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतात.
लोकमान्य टिळकांनी मराठा वूत्तपत्र सुरू केलं.
चार तारखे पर्यंत सरकारला अल्टिमेट.
लाऊड स्पीकर कोणत्याच धर्मा मध्ये बसत नाही.
चार तारखेपर्यंत मशिदीवरील भोंगे खाली उतरावा.
उत्तर प्रदेश खाली उतरले जाऊ शकतात मग महाराष्ट्रात का नाही.
महाराष्ट्रात दंगली घडविण्याचा आमचा हेतू नाही.
चार तारखे पर्यंत भोंगे खाली नाही आले तर काय होईल माहीत नाही.
भोंगे हा धर्मीक विषय नसून तो सामाजिक.
महाराष्ट्रातल्या सगळ्या भागात सभा घेणार
स्वाभिमानाने कसं जगायचं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं.
संपूर्ण मराठी शाहीचा इतिहास विसरलो.
यासह अनेक मुद्दे मांडून त्यांनी औरंगाबादची सभा चांगलीच गाजवली.या सभेला प्रचंड मोठा जनसमुदाय उपस्थित होता.