---Advertisement---

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसनिमित्त सिद्धेश्वर मंदिरात महाआरती

Follow Us:
---Advertisement---

 

सोलापूर – पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिवसनिमित्त ग्रामदैवत श्री.सिद्धरामेश्वर मंदिरात संध्याकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी दिली. या महाआरती मध्ये सर्वांनी अधिकाधिक सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा १७ सप्टेंबर रोजी जन्मदिवसनिमित्त १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर दरम्यान देशभरात सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. त्याअंतर्गत सोमवारी १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ८ वाजता ग्रामदैवत श्री. सिद्धरामेश्वर मंदिरात ही महाआरती केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना दीर्घायुष्य लाभो, देशाची अविरत, अखंडपणे सेवा करण्यासाठी त्यांना बळ मिळो यासाठी ग्रामदैवत श्री.सिद्धरामेश्वर यांना महाआरती करून प्रार्थना केली जाणार असल्याची माहिती खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी दिली.

या महाआरतीसाठी समस्त सोलापूरकरांनी सहभागी होण्याचे आवाहन खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!