---Advertisement---

सोलापूर जिल्हा हॉलीबॉल संघात संगमेश्वर पब्लिक स्कूलचे तनिष्क अगरवाल आणि आशुतोष येलुरे

On: September 25, 2022 11:52 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्हा टेनिस व्हॉलिबॉल संघटनेच्या वतीने बुलढाणा येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचा टेनिस व्हॉलिबॉल संघ रवाना झाला.या संघात संगमेश्वर पब्लिक स्कूलचे तनिष्क अग्रवाल आणि आशुतोष येलुरे यांची निवड झाली आहे.

निवड समितीचे चेअरमन वसीम शेख, रवींद्र चव्हाण, इक्बाल दलाल यांनी सोलापूर शहर व जिल्ह्याचा संघ ज्युनियर व ज्युनियर मुला-मुलींचे संघ जाहीर केले. या खेळाडूंचे सोलापूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष कार्तिक चव्हाण, राज्य उपाध्यक्ष प्रा.नंदकुमार देशपांडे, जिल्हा सचिव प्रा.संतोष खंडे ,खंडेराव शिंदे, प्रशांत बिराजदार यांनी अभिनंदन केले.

या निवडीबद्दल संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव धर्मराज कडादी, प्राचार्य गायत्री कुलकर्णी आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. सब ज्युनियर मुलांचा संघ – तनिष्का अग्रवाल, आशुतोष येलुरे, वेदांत चव्हाण, रोहित शिंदे, प्रतीक पाटील, प्रसाद घाडगे, राजवीर सुर्वे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!