---Advertisement---

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा सोलापूर जिल्हा दौरा

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर, दि.3  : राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा राधाकृष्ण विखे – पाटील हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे –

सोमवार दिनांक 03 ऑक्टोंबर 2022 रोजी सायं.6.30 वा. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील भक्त निवास,भटुंबरे, पंढरपूर येथे आगमन भेट व चर्चा. यानंतर शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे मुक्काम.

मंगळवार दिनांक 04 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी 8.45 वा. शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथून श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर कडे प्रयाण. सकाळी 9.00 वा.श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर येथे दर्शन. सकाळी 9.30 वा. पंढरपूर येथून मोटारीने सोलापूरकडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. सोलापूर येथे आगमन व जुना पुणे नाका येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन. पांझरपोळ चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन. पार्क चौक येथे चार हुतात्मांच्या पुतळ्यास अभिवादन व सुशोभिकरण. महानगरपालिका इमारती समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन. सकाळी 11.00 वा. सिध्देश्वर मंदिर येथे आगमन व दर्शन. सकाळी 11.30 वा. नियोजन भवन, सात रस्ता येथे आगमन व जनावरांना झालेल्या लम्पी स्कीन आजाराबाबत आढावा व पशुसंवर्धन आयुक्त व लम्पी आजाराच्या अनुषंगाने गठीत केलेल्या टास्क फोर्स सोबत चर्चा. दुपारी 12.00 वा. नियोजन भवन, सात रस्ता येथे मुख्यमंत्री सडक योजना बाबत आढावा बैठक. दुपारी 12.30 वा. नियोजन भवन, सात रस्ता येथे पंढरपूर विकास आराखडा सादरीकरण, बैठक व चर्चा. दुपारी 12.45 वा. हॉटेल हेरिटेज येथे लोक प्रतिनिधी व पदाधिकारी यांचे समवेत चर्चा व राखीव. दुपारी 2.00 वा. नियोजन भवन, सात रस्ता येथे जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक. दुपारी 3.45 वा. नियोजन भवन, सात रस्ता येथे पत्रकार परिषद. सायं 4.00 वा. सोलापूर येथून मोटारीने तुळजापूर कडे प्रयाण. सायं. 4.45 वा. तुळजापूर मंदिर येथे आगमन व दर्शन. सायं.5.30 तुळजापूर येथून मोटारीने सोलापूरकडे प्रयाण. सायं.6.15 वा. शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव. सायं.6.30 वा. सिध्देश्वर तलाव येथे आगमन व लाईट ॲण्ड साऊंड शो लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. सायं.6.45 वा. सोलापूर येथून अक्कलकोट कडे प्रयाण. सायं. 7.30 वा. श्री.स्वामी समर्थ महाराज मंदिर येथे आगमन व दर्शन. रात्रौ. 8.00 वा. मा. आमदार कल्याण शेट्टी यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट व राखीव. रात्रौ.8.30 वा. अक्कलकोट येथून गाणगापूर कडे प्रयाण. रात्रौ. 10.00 वा. गाणगापूर येथे आगमन , दर्शन व मुक्काम.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!