---Advertisement---

माढा नगरपंचायतीमधील कर विभागातील अपहाराबाबत चौकशी करू, सहकार महर्षी गणपतराव साठे प्रतिष्ठानच्यावतीने नूतन पालकमंत्र्यांचा सत्कार

Follow Us:
---Advertisement---

माढा, दि.६ : माढा येथील सहकार महर्षी गणपतराव साठे सेवाभावी प्रतिष्ठानच्यावतीने नूतन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप साठे व नगरसेवक शहाजी साठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वेळी माढा शहराच्या विविध विकासकामांच्या निधीबाबत चर्चेनंतर पालकमंत्र्यांनी आगामी काळात निधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मकता दर्शवली.

 

सत्कारानंतर साठे यांनी पालकमंत्र्यांशी विविध समस्यांबाबत चर्चा केली. त्यावेळी त्यांनी माढा नगरपंचायतीमधील कर विभागात झालेल्या पाऊणे नऊ लाख रूपयांच्या अपहाराबाबत पालकमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करून याप्रकरणी लक्ष घालून जनतेने कर रूपात भरलेला पैसा जनतेला मिळावा व दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी केली. तसेच माढा शहराला येवती तलावातून पाइपलाइन द्वारे पाणीपुरवठा केला जातो.

सदर पाईपलाईन कुजल्यामुळे शहराला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होऊन नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे या पाइपलाइनच्या दुरूस्तीसाठी लागणारा निधी तसेच शहराच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची उपलब्धता करूण देण्याची मागणी केली. त्यावर पालकमंत्र्यांनी माढा नगरपंचायतीमध्ये झालेल्या अपहाराची आपण गांभीर्यपूर्वक दखल घेऊन माढा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याबाबत सहकार्य करू, अशी ग्वाही दिली.

यावेळी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, जय हिंद शुगरचे गणेश माने देशमुख, अर्जुन पाटील, माढा नगरपंचायतीचे माजी नगरसेवक समीर सापटणेकर, युवासेनेचे अध्यक्ष प्रियदर्शन साठे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!