स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे आवाहन
अक्कलाकेट, दि.3 : तालुक्यातील श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना 2022-23 या गळीत हंगामाकरिता सज्ज झाले असून शेतकर्यांनी कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावेत असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी केले. ते गुरुवारी तालुक्यातील तडवळ येथील याबाजी कॉम्प्लेक्स येथे पंचक्रोशीतील शेतकर्यांबरोबर विचार-विनिमय बैठकीच्यावेळी पाटील हे बोलत होते.
दरम्यान माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी वेळोवेळी राज्य सरकार आणि सहकार विभागाकडे पाठपुरावा केला त्याला आता यश आले असून यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी कारखान्याची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. डिसेंबरमध्ये कारखाना गळीत हंगाम प्रारंभ होणार आहे.
याप्रसंगी पाटील यांनी एकंदरीत कारखान्याच्या धोरणाबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं यंदाच्या गळीत हंगामात शेतकऱी सभासदांनी कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावे जिल्ह्यातील इतर कारखान्याबरोबर दर देण्यास आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही पाटील यांनी दिली.
याप्रसंगी सिद्धेश्वर सहकार साखर कारखान्याचे संचालक काशिनाथ कोडते, सुरेश झळकी, माजी संचालक निलप्पा विजापुरे, अण्णाराव याबाजी, शिवसिद्ध बुळ्ळा, सिद्धाप्पा गड्डी, भीमाशंकर विजापुरे, संजय याबाजी, आप्पासाहेब बिराजदार, रमेश कोटगी, स्वामी समर्थ सूतगिरणीचे संचालक बसवराज बाके, मल्लिकार्जुन धारसंगे, केगावचे चेअरमन कल्लप्पा हंगरगी, सुलेर जवळगे सोसायटीचे चेअरमन रविकांत बगले, भद्रशेन अरवत, माजी सरपंच धरेप्पा अरवत, शिवमुर्ती विजापुरे, अंबरनाथ विजापुरे, विवेक ईश्वरकट्टी यांच्यासह तडवळ भागातील विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सदस्य, प्रतिष्ठित नेतेमंडळी उपस्थित होते.