ध्यास विश्वसार्ह बातमीचा

“गेल्या अनेक वर्षात अशा अनेक मंत्र्यांच्या नियुक्त्या त्याविषयी झाली ; सीमा बांधवांचे अश्रू पुसण्यासाठी चंद्रकांत पाटील आले, ना आताचे मुख्यमंत्री – खासदार संजय राऊत

दिल्ली : जुलूम, अत्याचाराच्या वरवंट्याखाली भरडल्या जाणाऱ्या सीमा बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यातील ईडी सरकारवर सडकून टीका केली आहे. ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान उघड्या डोळ्याने पाहात आहेत आणि अपमान करणाऱ्यांचा बचाव करत आहेत ते सीमाबांधवांना काय न्याय देणार ? असा परखड सवाल राऊत यांनी विचारला आहे. दिल्लीमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी हे उद्गार काढले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील प्रश्न सोडवण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की “गेल्या अनेक वर्षात अशा अनेक मंत्र्यांच्या नियुक्त्या त्याविषयी झाली आहे, मुख्यमंत्री शिंदे देखील युती शासनाच्या काळात दोन्ही वेळेला बेळगाव संदर्भातील विषयाचे खास मंत्री होते. चंद्रकांत पाटील यांच्यावरही तेव्हा जबाबदारी होती. हे मंत्री किती वेळा बेळगावात गेले? मी एकनाथ शिंदे यांना वारंवार विनंती करत होतो, की आपण या एकदा, या खात्याचे आपण मंत्री आहात. मात्र सीमा बांधवांचे अश्रू पुसण्यासाठी चंद्रकांत पाटीलही कधी आले नाहीत ना आताचे मुख्यमंत्री तिथे पोहोचले. का पोचले नाहीत ? आता असे काय दिवे लावणार आहात, मुख्यमंत्री म्हणून? सगळ्यात आधी आपण बेळगावात जायला हवं. तिथल्या मुख्यमंत्र्यांना भेटून सांगायला हवं की सीमाभागातील ज्या मराठी तरुणांवर खोटे खटले दाखल झाले आहेत, ते मागे घ्या… हिंमतीने सांगा.. नाही तर महाराष्ट्र आहे हे दाखवून द्या.”

ज्या महाराष्ट्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान उघड्या डोळ्याने पाहत आहेत आणि अपमान करणारयऱ्यांचा बचाव करत आहेत ते सीमा बांधवांना काय न्याय देणार ? कितिवेळा गेलात आपण सीमा भागात असा प्रश्न संजय टाउत यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारला विचारलं. 1 नोव्हेंबर ला सीमा भागात काल दिवस पाळला जातो, तिथे महाराष्ट्रातील एकही मंत्री गेला नव्हता. मुख्यमंत्री या विषयावर पंतप्रधानाना भेटणार अस वाचाल आहे, तुम्ही भेटून पंतप्रधानांशी चर्चा करणार असाल तर पंतप्रधानांशी तुम्ही काय बोलताय याच संपूर्ण रेकॉर्डिंग बाहेर घेऊन या आणि राज्याच्या जनतेला दाखवा असेही संजय राऊत म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!