---Advertisement---

ब्राझीलला तीन वेळा फिफा विश्वचषक जिंकून देणारे महान खेळाडू पेले यांनी घेतला जगाचा निरोप

Follow Us:
---Advertisement---

दिल्ली : क्रीडाविश्वातून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेले पेले यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. कर्करोगाने त्रस्त असलेले पेले काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. पेले यांच्या निधनाने क्रीडाजगत हळहळले आहे.

पेले यांच्या निधनानंतर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. सध्याच्या काळातील स्टार फुटबॉलपटूंनीही पेले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीसह पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो, फ्रान्सचा युवा किलियन एमबाप्पे यांच्यासह अनेक दिग्गजांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पेले यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!