केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या बजेटमध्ये अनेक चांगल्या घोषणा, गुंतवणूकदारांकडून अर्थ संकल्पाचे स्वागत स्वागत
दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या बजेटमध्ये अनेक चांगल्या घोषणा केल्या आहेत. करसवलतींसह अनेक उद्योगाभिमुख, रोजगाराला प्रोत्साहन देणाऱ्या योजना त्यांनी सादर केल्या. त्याचा परिणाम आज मुंबई शेअर बाजारावर दिसून आला. सेन्सेक्सने तब्बल ११०० अंशांची म्हणजेच अंदाजे १.७४ टक्के उसळी घेत आपला आनंद व्यक्त केला. सेंन्सेक्स सध्या ६०,६६०.६२ अंशांवर ट्रेड करत आहे.
निफ्टीतही 256.25 अंशांची उसळी घेत तो सध्या १७, ९१८.४० अंशांवर ट्रेड करत आहे. आज बँक आणि आयटी समभागात चांगली खरेदी आहे. आशियाई बाजारपेठेतही चांगली तेजी आहे.
आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्रत्येक क्षेत्रात खरेदी आहे. निफ्टीवरील बँक आणि वित्तीय निर्देशांक १ टक्क्यांहून अधिक मजबूत झाले आहेत. त्याच वेळी, रिअल्टी निर्देशांक देखील १ टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मेटल इंडेक्समध्ये सुमारे १ टक्के आणि ऑटो इंडेक्समध्ये अर्धा टक्का वाढ दिसत आहे. फार्मा, एफएमसीजीसह इतर निर्देशांकही हिरव्या रंगात आहेत.
सेन्सेक्समधील ३० पैकी २९ कंपन्यांचे समभाग हिरव्या चिन्हात आहेत. आजच्या टॉप गेनर्समध्ये आयसीआयसीआय, कोटक बँक, एचडीएफसी, एसबीआय, टाटा स्टील, टेकएम, एचडीएफसी, एचयूएल, विप्रो या कंपन्यांचा समावेश आहे.