सोलापूर,दि.५ : प्रतिनिधी – नवोदित साहित्यिकांचे विचारपीठ असलेल्या अंकुर साहित्य संघ सोलापूरच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय साहित्य व राज्यस्तरीय समाजसेवक पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय उपाध्यक्ष पत्रकार भरतकुमार मोरे व जिल्हाध्यक्ष कवी नागनाथ गायकवाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली .
कवी नागनाथ गायकवाड साहित्य गौरव पुरस्काराकरिता सन १ जानेवारी २१ ते ३१ डिसेंबर २१ तसेच १ जानेवारी २२ ते३१ डिसेंबर २२ अखेर प्रकाशित झालेल्या आत्मकथन व काव्यसंग्रहासाठी हे दोन पुरस्कार देण्यात येणार आहे .तर दलित मित्र स्व .सौदागर मोरे समाजभूषण पुरस्काराकरता राज्य, जिल्ह्यातील समाजसेवकाचा पुरस्काराने गौरव केला जाणार आहे . रोख रक्कम, गौरवचिन्ह प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून एप्रिल २३ महिन्यात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे .इच्छुक साहित्यिकांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या साहित्य कलाकृती व प्रस्ताव दोन प्रतीत आत्मकथन व काव्यसंग्रहफेब्रुवारी २३ अखेर प्रत्यक्ष आता पोस्टाने भरतकुमार मोरे ” अनुष्का” प्लॉट नंबर १९, डुमणे नगर, बार्शी रोड, बाळे सोलापूर . पिन कोड 413255.या पत्त्यावर पाठवावेत असे आवाहन करण्यात आले .या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष विकास कस्तुरे कवी रामप्रभू माने अंबादास जाधव आदी उपस्थित होते .