---Advertisement---

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी जाहीर ; अध्यक्षपदी मनीष केत तर सचिवपदी वसीम अत्तार

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. बीआर न्यूजचे संचालक तथा विद्यमान अध्यक्ष मनीष केत यांची एकमताने फेरनिवड तर लोकशाही न्यूज चॅनेलचे जिल्हाप्रतिनिधी वसीम अत्तार यांची प्रथमच सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे.

रविवारी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्यसंघटक संजय भोकरे आणि जेष्ठ सल्लागार आणि दैनिक सुराज्यचे संपादक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान कार्यकारिणीची बैठक पार पडली.या बैठकीत संघाच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला.त्यावेळी सदस्यांचे आरोग्य, सेवा सुविधा,विविध उपक्रम, वार्तालाप यावर चर्चा झाली.त्यानंतर 2023-2024 च्या कार्यकारिणीत अध्यक्षांना कायम ठेवून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला. त्यानुसार खालील निवडी करण्यात आल्या.या पदाधिकाऱ्यांच्या निवडी खालीलप्रमाणे करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ

अध्यक्ष – मनीष केत  (-बीआर न्यूज), उपाध्यक्ष – मिलिंद राऊळ (दैनिक लोकमत), उपाध्यक्ष – विनोद हुमनाबादकर (टीव्ही 9), सचिव –  वसीम अत्तार (लोकशाही न्यूज ), सहसचिव – विश्वभूषण लिमये (साम न्यूज), सहसचिव – केवल तिवारी (दैनिक तरुण भारत), खजिनदार – विजय आवटे (येस न्यूज मराठी), प्रसिद्धी प्रमुख – अनिल कांबळे (न्यूज 18 लोकमत कॅमेरामन ), सहप्रसिद्धी प्रमुख – अंबादास पोळ (दैनिक पुढारी ),

कार्यकारिणी सदस्य

मनोज हुलसुरे  – (इन न्यूज ), प्रितम पंडित  – (न्यूज 18 लोकमत), नितीन कटके – (दैनिक तरुण भारत संवाद), तौसिफ शेख – (लाईव्ह सोलापूर), आदित्य केंगार – (बीआर न्यूज),

मार्गदर्शक मंडळ

युसूफ शेख (दैनिक दिव्य मराठी), आयुब कागदी (एबीपी माझा)

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!