---Advertisement---

अक्कलकोटमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी;काँग्रेस तर्फे उद्या निवेदन : शीतल म्हेत्रे

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.१९ : अक्कलकोट
तालुक्यात अवकाळी पाऊस,गारपीटमुळे नुकसान शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी,ही आपली प्रमुख मागणी असणार असल्याचे काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष शितल म्हेत्रे यांनी पत्रकारांशी बोलताना
सांगितले. शेतकऱ्यांवर अचानक कोसळलेल्या या संकटाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.अक्कलकोट शहर व तालुक्यात
शुक्रवारी व शनिवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटमुळे काही भागातील शेतकरी बाधंवाचे पिकांचे,
फळांचे प्रचंड नुकसान झाले आहे.हे नुकसान न भरून येणारे आहे.यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्यात यावे या मागणीचे निवेदन आम्ही काँग्रेच्यावतीने उद्या देणार असल्याचे म्हेत्रे यांनी सांगितले.तरी सायंकाळी ४ वाजता शेतकऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष बसवराज अळळोळी,युवकचे अध्यक्ष मुबारक
कोरबू यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!