---Advertisement---

दुधनीच्या म्हेत्रे प्रशालेची विद्यार्थिनी कन्नड विषयात पुणे बोर्डात प्रथम

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.१९ : इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत प्रथम भाषा कन्नड विषयात पुणे बोर्डात ९७ गुण मिळवून लक्ष्मी इरण्णा कोळी हिने प्रथम क्रमांकाचा मान मिळविला आहे.एकूण प्रशालेचा निकाल ९८.७ टक्के लागला आहे.या विद्यार्थिनीचे एस. बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.प्रशालेत कुमारी अल्फिया चिद्री हिने ९२.४० गुण मिळवून प्रथम ,कुमार शुभम मोसलगी ९२.२० टक्के घेऊन द्वितीय तर कुमारी फातिमा इटगी ९०.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे,उपाध्यक्ष वैशाली म्हेत्रे,सचिव प्रथमेश म्हेत्रे यांनी अभिनंदन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!