---Advertisement---

चिकोडी घटनेच्या निषेधार्थ जैन बांधवांचा अक्कलकोटमध्ये मूक मोर्चा

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट,दि.१८ : कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी येथे प.पू.आचार्यश्री १०८ कामकुमारनंदी महाराज यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.त्याच्या निषेधार्थ
अक्कलकोटमध्ये मुकमोर्चा काढण्यात आला. सकल जैन समाज, शैक्षणिक व सामाजिक संघटना,युवक व महिला मंडळ,सर्व व्यापारी संघटना यांच्या सहकार्याने या मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.हा मोर्चा सकाळी ९ वाजता श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन थोरले मंदिर मेनरोड येथून निघाला.मेन रोड,कारंजा चौक, मल्लिकार्जुन मंदिर , बसस्टँड ,ए- वन चौक , तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. सकाळपासूनच शहरामध्ये पावसाची रिपरिप सुरू होती.
तरीही या मुकमोर्चात सर्व समाजातील व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.तहसीलदारांना निवेदन देण्यात आले
याला अनेक व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला.यावेळी अभय खोबरे,राजकुमार शहा,संदेश शहा,सौरभ शहा,डॉ.विपुल शहा,उल्हास गडदे,प्रशांत विभूते,अप्पू आळंद,स्वप्नील आळंद,
राजकुमार विभूते,संजय विभूते,माधुरी शहा,स्वप्ना शहा,मंजुश्री आळे,अनिता खोबरे,रुपाली शहा, सुवर्णा गडदे ,मीनल शहा,डॉ.संतोष मेहता, ॲड. हर्षवर्धन ऐखंडे, संदेश शहा,बंडू विभूते,सुनील आळंद,प्रवीण शहा, स्वप्नील शहा,चंद्रकांत पंडित, विराग दोशी, शुभम शहा आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!