---Advertisement---

कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील बंजारा समाजाचा विकास करू;कर्नाटक विधानसभा उपाध्यक्ष राठोड यांचा बंजारा समाजाच्यावतीने सत्कार

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.२२ : कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही बंजारा समाजाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहेत, असे प्रतिपादन कर्नाटक विधानसभेचे उपाध्यक्ष रुद्रप्पा
राठोड यांनी केले.मंगळवारी, राठोड हे सोलापूर दौऱ्यावर आले होते.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी त्यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या विविध अडचणी जाणून घेतल्या. प्रारंभी लाला राठोड यांनी स्वागत केले. त्यानंतर सोलापूर जिल्हा बंजारा समाजाच्यावतीने विजापूर रोड
येथील पनाश येथे खास त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी आधार हॉस्पिटलचे युवराज राठोड, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे लाला राठोड,श्री संत सेवालाल महाराज मध्यवर्ती मिरवणूक समितीचे अध्यक्ष नाम
पवार, युवराज उर्फ पिंटू चव्हाण, एम.के फाउंडेशनचे महादेव कोगनूरे, शिवाजी राठोड, दीपक पवार ,अमोल राठोड आदी
उपस्थित होते.यावेळी मेहसूस नही है तुमको या अल्बममध्ये कवठे तांड्यातील बंजारा समाजाचे युवा कलाकार संजय गुरुनाथ चव्हाण मुख्य भूमिकेत पुन्हा एकदा झळकल्याने त्यांचाही विधानसभा उपाध्यक्ष राठोड यांच्या हस्ते सत्कार
करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.संजय चव्हाण यांनी याधीही मराठी चित्रपट टिफिन टाइम, जिगरी,द केज ऑफ लाईफ या चित्रपटातही काम केले
आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!