---Advertisement---

संभाजीराजे छत्रपती आरक्षणासाठी करणार दिल्लीवारी !

By team
On: November 27, 2023 2:14 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक जिल्ह्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरे करीत सभा घेत आहे पण यावर सरकार कुठलाही निर्णय घेत नसल्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. उद्या केंद्रीय मागासवर्ग आयोगाची ते भेट घेणार आहेत. मराठा समाजातील अनेक मराठा पदाधिकाऱ्यांच शिष्टमंडळ घेऊन संभाजीराजे आयोगासोबत बैठक घेणार आहेत. उद्या दुपारी दिल्लीत केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या कार्यालयात बैठक पार पडणार आहेत. मराठा आरक्षणासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न करण्यासाठी संभाजीराजे दिल्लीला जात असल्याची माहिती मिळत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!