---Advertisement---

‘एक अकेला सब पर भारी!’ : इराणी यांचे ट्वीट

By team
On: December 3, 2023 3:08 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील ४ राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकाल आज सकाळपासून हाती येत असून येत्या काही तासांमध्येच स्पष्ट होईल. या निकालाकडे सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक निकाल 2023 साठी सकाळपासून मतमोजणी सुरू आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार ४ पैकी ३ राज्यांमध्ये भाजपने बाजी मारली आहे. या तिन्ही राज्यात भाजप आघाडीवर असून विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सध्या देशभरातील भाजप कार्यालयामध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू आहे.

अशामध्ये भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे ट्वीट चर्चेत आले आहे. केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी ३ राज्यातील भाजपच्या विजयानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स अर्थात ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी या तिन्ही राज्यांच्या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले आहे. त्यांनी मोदींचा लोकसभेतील भाषणाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये ‘एक अकेला सब पर भारी!’ असे कॅप्शन दिले आहे.

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!