पुणे : वृत्तसंस्था
वाढदिवसाच्या केकवर लावण्यात येणाऱ्या शोभेच्या फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्याने सहा महिला कामगारांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. यात कारखाना मालकासह १० महिला जखमी झाल्या असून, काहीजण गंभीर आहेत. तळवडे येथील जोतिबानगरात शुक्रवारी दुपारी पाउलोतीकच्या सुमारास ही दुर्घटना समजू शकले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील तळवडेतील ‘राणा इंजिनिअरिंग’ या फॅब्रिकेशन शॉपच्या परिसरात फायर क्रेकरचा अनधिकृत कारखाना आहे. येथे पंधरा ते वीस महिला फटाका बनविण्याचे काम करीत होत्या. दुपारी तेथे अचानक आग लागून स्फोट झाला. फायर क्रॅकरचे साहित्य आणि दारूने पेट घेतला. कारखान्यास एकच दरवाजा असल्याने महिलांना बाहेर पडता आले नाही.
जखमींची नावे
अपेक्षा तोरणे (वय २६), प्रियंका यादव (३२), कविता राठोड (४५), राधा ऊर्फ सुमन राठोड (४०), उषा पाडवी (४०), रेणुका ताथवडे (२०), कोमल चौरे (२५), शिल्पा राठोड (३१), प्रतीक्षा तोरणे (१६) आणि कारखाना मालक शरद सुतार (४५, सर्व रा. तळवडे)