---Advertisement---

आम्ही एकत्र बसून घेतला निर्णय ; शरद पवार !

By team
On: December 26, 2023 9:16 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

आम्ही केले ते बंड नव्हते, आम्ही एकत्र बसून निर्णय घेतला होता. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेला धरून घेतलेला तो निर्णय होता. त्याबद्दल कोणी तक्रार करण्याची गरज नाही. आज कोणी काही केले असेल, तर त्याबद्दलही तक्रार नाही. मात्र, पक्षाची निर्मिती कशी झाली? संस्थापक कोण आहे? हे सर्वांना माहिती आहे, त्यामुळे त्यावर भाष्य तरी कशाला करायचे? असा प्रश्न करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

अजित पवार यांनी बारामतीमध्ये बोलताना शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख न करता, आता माझंच ऐका कुणाचं ऐकू नका. त्यांचं बरीच वर्षे ऐकलं. मी तरी वयाच्या साठाव्या वर्षी वेगळा निर्णय घेतला, त्यांनी तर वयाच्या ३८व्या वर्षीच तसा निर्णय घेतला होता, असे म्हटले. शरद पवार यांनी सोमवारी भीमथडी जत्रेत अजित पवार यांचे नाव न घेता त्यांना प्रत्युत्तर दिले

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!