---Advertisement---

लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेत देखील फिरविणार भाकरी !

By team
On: December 30, 2023 10:46 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

देशातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष कामाला लागले असून यात मनसे देखील मागे नाही. आता मनसेत देखील भाकरी फिरवणार असल्याची माहिती मिळाली असून ज्या पदाधिकारी आणि विभाग अध्यक्षांनी कामे केली नाहीत त्यांच्या जागी नवीन चेहरे देण्यात येणार आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि विभाग अध्यक्ष यांना मतदार संघात मोठे कार्यक्रम घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नवीन वर्षात राज ठाकरे नवीन चेहऱ्यांना संधी देणार. पुढील आठवड्यातच भाकरी फिरलेली दिसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील आठवड्यात मुंबईतील पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करून नवीन जबाबदारी देणार असं म्हटलं जातंय. लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी मनसेमध्ये अशा पद्धतीने बदल करण्यात येणार आहेत.

अनेक ठिकाणी जी मंडळी काम करत आहेत तेथे त्यांना आणखी चालना मिळेल. ज्या व्यक्ती काम करत नाहीत त्यांना तेथेच थांबवले जाईल. प्रत्येक पक्षात ही प्रक्रिया होते त्याप्रमाणे आमच्या पक्षात देखील ही प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर या गोष्टी होणं गरजेचं आहे. निवडणूक जिंकायची तर काम करणं गरजेचं आहे. त्यासाठी ग्राउंडलेवला काम करणारा प्रत्येक सैनिक ताकदीचा असावा. त्यामुळे असा ताकदीचा सैनिक उभं करणं पक्षाचं काम आहे, हे काम पक्ष करत आहे, अशी प्रतिक्रिया मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!