---Advertisement---

मनोज जरांगे पाटलांनी घेतला लेझीम खेळण्याचा आनंद !

By team
On: December 30, 2023 10:58 AM
Follow Us:
---Advertisement---

जालना : वृत्तसंस्था

काही दिवसांपूर्वीच जरांगे यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ समोर आला होता.मराठा आरक्षणासाठी सभेत जोरदार फटकेबाजी करत सरकारला धारेवर धरणारे मनोज जरांगे पाटील क्रिकेटच्या पीचवर खेळताना दिसले. क्रिकेट खेळतानाचे मनोज जरांगे यांचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. आता जालन्यात जरांगे पाटील यांनी लेझीम खेळण्याचा आनंद लुटला आहे.

Watch Our Latest Video

मराठा आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता सरकारला इशारा दिला आहे. आता जालन्यात जरांगे पाटील यांनी लेझीम खेळण्याचा आनंद लुटला आहे. त्यांचा हा व्हिडिओ देखील समोर आहे. जालन्यात मराठा समाजाच्या बांधवांसोबत ते लेझीम खेळताना दिसले. ढोल- ताशांच्या तालावर त्यांनी लेझीम खेळली. त्यांचा लेझीम खेळातानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत मनोज जरांगे अतिशय छान लेझीम खेळताना दिसत आहेत. ढोल-ताशांच्या तालावर त्यांनी लेझीम खेळताना अचूक ठेका धरला. यावेळी मराठा समाज बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!