---Advertisement---

सोलापूर जिल्ह्यात हिरकणी बस सेवा सुरू !

By team
On: December 31, 2023 1:22 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील व अक्कलकोट पंचक्रोशीतील प्रवासी जनतेच्या मागणीनुसार अक्कलकोट-पंढरपूर-कोल्हापूर आदमापूर अशी विविध तीर्थस्थळांची भेट घडवणारी अक्कलकोट-मुरगुड ही बस सेवा एसटीने सुरू केली आहे. विशेष म्हणजे अक्कलकोट बस स्थानकावरून थेट श्री क्षेत्र आदमापूर साठी पहिल्यांदाच एसटीची हिरकणी (एशियाड) नावाची निम- आराम बस सेवा सुरू झाली आहे. ही बस मुरगुड इथून सकाळी ९ वाजता निघून आदमापुर, कोल्हापूर, मिरज, पंढरपूर, सोलापूर मार्गे अक्कलकोटला संध्याकाळी ५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात दुसऱ्या दिवशी सदर बस सकाळी अक्कलकोट हुन ७:३० वाजता निघून सोलापूर ,पंढरपूर, मिरज ,कोल्हापूर, आदमापुर मार्गे मुरगुडे इथे दुपारी ३:३० वाजता पोहोचेल.

विशेष म्हणजे शासनाने देऊ केलेल्या सर्व सवलती या बसेसला लागू आहेत. त्यामुळे ७५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना १०० टक्के मोफत तर ६५ ते ७५ च्या दरम्यान चे ज्येष्ठ नागरिक व महिलांना व १२ वर्षा खालील लहान मुलांना तिकिटात ५० टक्के सवलत मिळणार आहे. ही बस सुरू झाल्यामुळे मुरगूड आणि पंचक्रोशीतील नागरिकांना सहकुटुंब पंढरपुर, अक्कलकोट या धार्मिक तीर्थस्थळांना भेटी देणे शक्य होणार आहे. तसेच सोलापूर आणि दक्षिण महाराष्ट्रातील अनेक भाविकांना श्री संत बाळूमामाच्या दर्शनासाठी या बसने थेट श्रीक्षेत्र आदमापुरला येणे शक्य होणार आहे.तरी या बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!