---Advertisement---

बिहारचा कव्वाली कार्यक्रम होणार मोटयाळात !

By team
On: January 1, 2024 4:09 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील मोट्याळ येथील हजरत पिर दावल मलिक यात्रेस दि.४ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. ही यात्रा ६ जानेवारीपर्यंत चालणार असून या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.आसिया पोल्ट्री फार्मचे मालक महिबूब उंबर मुल्ला यांच्यावतीने दि.५ जानेवारीला सायंकाळी ८ वाजता बिहारचे सुप्रसिद्ध कव्वाली गायक शाहरुख साबरी यांच्या काव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कलाकारांचा कव्वालीचा कार्यक्रम महाराष्ट्रमध्ये पहिल्यांदाच होत आहे.साबरी हे बिहारचे प्रसिद्ध कव्वाली गायक आहेत.

औरंगाबाद येथील प्रसिद्ध कव्वाली गायिका इरम चिस्ती यांच्या सोबत त्यांची जुगलबंदी रंगणार आहे. या कार्यक्रमास मोट्याळ, कुरनूर परिसरातील नागरिकांसह अक्कलकोट तालुक्यातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन कव्वालीचा मनमुराद आनंद घ्यावा,असे आवाहन हजरत दावल मलिक उरूस पंच कमिटीने यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!