---Advertisement---

संपात पडली फुट : पेट्रोल-डिझेलची निर्माण झाली टंचाई !

By team
On: January 2, 2024 10:34 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात विदर्भ आणि कोल्हापूरमधील ट्रक चालकांनी संप मागे घेतला आहे. परंतु राज्यातील इतर ठिकाणी संप सुरुच आहे. पहिल्या दिवशी राज्यातील ट्रकचालकही सहभागी झाले होते. राज्यातील टँकर चालकांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. त्याचवेळी संपामध्ये फूट पडली आहे.

कोल्हापूरमधील वाहन धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. इंधन वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी पुकारलेला संप रात्री उशिरा मागे घेतला आहे. या संपामुळे काल रात्री कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर लागल्या होत्या. कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा आवश्यक साठा आहे. नागरिकांनी घाबरून जाऊन पेट्रोल पंपावर गर्दी करू नये, असे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.

सरकारशी चर्चा केल्यानंतर विदर्भातील ट्रक चालकांनी संप मागे घेतला आहे. नागपूर आणि विदर्भातील ट्रक चालकांनी संप मागे घेतला आहे. रस्त्यांवर वाहतूक सुरुळीत सुरु झाली आहे. ट्रक चालक संपाचा परिणाम पेट्रोल आणि डिझेल पुरवठ्यावरही झाला आहे. दुसरीकडे अमरावतीमध्ये पेट्रोल पंपावर पहाटे पासूनच वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध नसल्याने रुग्णवाहिका, स्कूल बस तसेच सर्वसामान्यांवर फटका बसला आहे. पुणे शहरात ट्रक चालकांनी संप कायम ठेवला आहे. सोलापुरात पेट्रोल पंपावर सकाळपासून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पेट्रोल पंप बंद असल्याच्या चर्चेने नागरिकांनी काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर रांगा लावल्या आहेत.

ट्रक चालकांच्या देशव्यापी संपाचा पेट्रोल डिझेलला फटका बसला आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सर्वच पेट्रोल पंपावर आज सकाळीपासूनच पेट्रोल डिझेल नाही, असे फलक लावले आहेत. सोमवारी दिवसभरात पेट्रोल डिझेलचे टँकर आले नसल्याने, पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोल पंपावर डिझेल पेट्रोल मिळत नसल्याने ट्रक, टेम्पो पंपावर लावण्यात आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!