चप्पळगाव : प्रतिनिधी
बाळशास्त्री जांभेकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी आपल्या लेखणीची धार कायम ठेवली होती. त्यांची पत्रकारिता समाजाभिमुख होती.असे प्रतिपादन लिंगायत मठाचे पूज्य बसवलिंग महास्वामीजी यांनी व्यक्त केले.
चपळगाव तालुका अक्कलकोट येथे रिणाती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पत्रकार दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता.सोलापूर जिल्हा इंडियन प्रेस क्लब आणि मनीषा बहुउद्देशीय समाजसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या शानदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी चपळगावच्या विद्यमान सरपंच वर्षा भंडारकवठे या होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत आयोजक स्वामीनाथ हरवाळकर यांनी केले.
पुढे बोलताना,पूज्ज्य बसवलिंग महास्वामीजी यांनी मनीषा बहुउद्देशीय,सामाजिक संस्था ग्रामीण भागातील दीपस्तंभ असल्याचे गौरवोद्गार काढले.कार्यक्रमास उमेश पाटील,राजेंद्र लांडगे,सिद्धू भंडारकवठे,अंबण्णा भंगे, बाळासाहेब मोरे,महेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पाटील यांनी केले तर आभार शंभूलिंग अकतनाळ यांनी मानले.