---Advertisement---

सोलापूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयासाठी स्थानिक सुट्टया जाहीर

By team
On: January 12, 2024 3:35 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी यांना प्रधान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन सन 2024 या वर्षासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील राज्य शासनाच्या सर्व कार्यालयांसाठी तीन स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत.

जिल्ह्यातील शासकीय कार्यालयासाठी मकर संक्रांत, सोमवार दि. 15 जानेवारी 2024, अनंत चतुर्दशी, मंगळवार दि. 17 सप्टेंबर 2024 तसेच नरक चतुर्दशी, गुरुवार दि.31 ऑक्टोबर 2024 या प्रमाणे तीन स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!