---Advertisement---

ठाकरे फोटोग्राफी करायचे तेव्हा फडणवीस कारसेवक होते ; बावनकुळे यांचे उत्तर !

By team
On: January 13, 2024 6:44 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

देशातील अयोध्या येथे प्रभू राम मंदिराचे येत्या काही दिवसात उदघाटन होत आहे. यापूर्वी राज्याचे राजकारण तापले आहे. ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस समजलेच नाहीत. माझा त्यांचा 35 वर्षांचा संबंध आहे. उद्धव ठाकरे फोटोग्राफी करायचे तेव्हा देवेंद्र फडणवीस कारसेवक होते. सात जन्म जरी उद्धव ठाकरेंनी घेतले तरी फडणवीसांची बरोबरी करु शकत नाहीत, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, काळाराम मंदिरात पुजा करण्याचा त्यांचा अधिकार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नपुर्तीचा 22 जानेवारी हा दिवस आहे. बाळासाहेबवरुन बघत असतील, माझा उद्धव अयोध्येत का जात नाही. कशाची अॅलर्जी माझ्या उद्धवला झाली असे ते बोलतील असा टोला त्यांनी लगावला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, स्टॅलीनचा मुलगा म्हटला होता की हिंदू धर्म संपवू. अशा सोबत उद्धव जी राहतात. मोदीजी किती घरंदाज आहेत, हे 2024 ला दिसेल. उरणमध्ये 90 हजार महिला मोदींना नमस्कार करायला आल्या होत्या, असेही बावनकुळे म्हणाले. मोदीजीच्या वादळात महाविकास आघाडी झाड-पत्यांसारखी उडून जाईल, असा टोलाही यावेळी बावनकुळे यांनी लगावला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!