---Advertisement---

कायदे पायदळी तुडवत निकाल दिला ; संजय राऊतांची टीका !

By team
On: January 18, 2024 9:28 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल देताना, संविधान आणि कायदे पायदळी तुडवले, असा आरोप करत शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी वकील असलेल्या विधानसभा अध्यक्षांची आता पदवी तपासावी लागेल, असा हल्लाबोल केला आहे. विधानसभा अध्यक्षांनी घेतलेली पत्रकार परिषद राजकीय होती, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाचा विषय चिघळत असून शिवसेनेने (ठाकरे) महापत्रकार परिषद घेऊन पक्षाची घटना, कार्यकारिणीच्या निवडणुकीची चित्रफीत दाखवून अध्यक्षांचा निकाल आपल्यावर अन्यायकारक असल्याचा दावा केला. अध्यक्ष नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याला प्रत्युत्तर दिले. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत पुन्हा एक दा विधानसभा अध्यक्ष आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

एकदा पक्षाची घटना निवडणूक आयोगाला दिल्यानंतर दरवर्षी घटना दिली जात नाही. केवळ केले जाणारे बदल कळवले जातात. नार्वेकर वकील आहेत. आमदारांचा निकाल देताना त्यांनी कायदे, संविधानाचा अभ्यास करण्याऐवजी पायमल्ली केली. लवादाची भूमिका बजावणे अपेक्षित असताना, राजकीय वळण दिले. हा प्रकार हास्यास्पद आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला. तसेच शिवसेनेने (ठाकरे) भक्कम पुरावे मांडल्यानंतरदेखील नार्वेकर यांनी राजकीय पत्रकार परिषद घेऊन जुने तुणतुणे वाजवले. नार्वेकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वकील आहेत. एकदा दोघांनी एकत्र बसून काय ते ठरवावे, असा टोला राऊत यांनी लगावला.

उद्धव ठाकरे यांनी जनतेत येऊन शिवसेना कुणाची हे सांगा, असे आव्हान दिले. त्यांनी ते स्वीकारले पाहिजे. हिंमत असेल तर जनतेसमोर या, त्यानंतर जो निकाल आहे तो छातीठोकपणे सांगा, असे आव्हान राऊत यांनी करताना आम्ही जेव्हा पुरावे दाखवले तेव्हा राहुल नार्वेकर बिनकाचेचा गॉगल लावून बसले होते का? असा टोलाही त्यांनी लगावला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!