---Advertisement---

प्रसिद्ध उद्योगपती अंबानी यांनी दिले इतके दान

By team
On: January 23, 2024 3:44 PM
Follow Us:
---Advertisement---

अयोध्या : वृत्तसंस्था

अयोध्याच नाहीतर अवघा देश रामलल्लाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाला असून राम मंदिराचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आजच्या ऐतिहासिक सोहळ्याला सर्व क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं होतं. देशातील प्रसिद्ध उद्योगपती रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सोहळ्याला आपल्या सर्व कुटुंबासह हजेरी लावली होती. मुकेश अंबानी यांनी राम मंदिर ट्रस्टला दिलेल्या देणगीचा आकडा समोर आला आहे.

मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी, मुलगी ईशा अंबानी, मुले आकाश अंबानी-अनंत अंबानी, जावई आनंद पिरामल आणि सून श्लोका उपस्थित होते. संपूर्ण अंबानी कुटूंब कडेकोट बंदोबस्तामध्ये विमानतळावरून राम मंदिरात पोहोचलं. यावेळी, जय श्री राम… हा ऐतिहासिक दिवस आहे. मला भारतीय संस्कृतीचा अभिमान असल्याचं नीता अंबानी म्हणाल्या.

मुकेश अंबानी यांनी राम मंदिर ट्रस्टला 2.51 कोटी रूपयांचं दान केल्याची माहिती समोर आली आहे. देशभरात दिवाळी साजरी झाली, या क्षणाचं साक्षीदार होता आलं हे माझं भाग्य समजतो, अशी प्रतिक्रिया मुकेश अंबानी यांनी दिली. यावेळी अंबानी कुटुंब हे आनंदी आणि उत्साही असलेलं पाहायला मिळालं. आजचा दिवस हा इतिहासाच्या पानांमध्य लिहिला जाईल, असं आकाश अंबानी म्हणाले. तर आजचा दिवस हा सर्वात पवित्र दिवसांपैकी एक असल्याचं ईशा अंबानी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा विधी पूर्ण करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!